बँक ऑफ महाराष्ट्र कडून 80 लाखांचे कर्ज,उमेद अभियानातील साठ गटांना मिळाला लाभ

0 107

गोपाल पोटे
परतूर,दि 25 ः
परतूर पंचायत समिती येथे गुरुवार रोजी उमेद अभियानातील साठ गटांना कर्ज वाटप करण्यात आले.
या मेळाव्यास उपस्थित जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेशित मोघे, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आष्टी व्यवस्थापक निलेश खरात, नाबार्डचे जिल्हा समन्वयक तेजस क्षीरसागर, तालुका व्यवस्थापक लक्ष्मण शेळके, परतूर शाखा व्यवस्थापक अरविंद मिश्रा, मंगेश डांबरे तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या अर्चना गरड, श्री शिंदे, श्री मयूर,श्री विठ्ठले, आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री मोघे म्हणाले की उमेद अभियानातील हो गटांना वार्षिक सात टक्के दराने कर्ज वितरित केले जाते गटांनी नियमित कर्ज परतफेड केली तर केंद्र शासनामार्फततीन टक्के एन आर आय एल व्याज अनुदान आणि राज्य शासनाच्या सुमतीबाई सुकळीकर योजनेमार्फत चार व्याज अनुदान दिले जाईल त्यामुळे गटांना मिळणाऱ्या कर्जावर शून्य व्याज लागेल. तसेच बँक कर्ज मधून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा पुढे बोलताना ते म्हणाले की गटातील सर्व महिलांनी आपले जनधन खाते उघडून पीएमजेजेवाय, पी एम एस बी वाय या विमा योजनेची नोंदणी करावी. व गटांना वेळेवर परतफेड केल्यानंतर वेळोवेळी कर्ज वितरित केले जाईल असेही ते यावेळी बोलत होते यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र परतूरच्या दहा तर आष्टी शाखेकडून 50 असे एकूण साठ गटांना ऐंशी लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!