नाशिकचा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्याची तयारी, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची डीजींसोबत बैठक

0 60

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी  करून दाखवलं, असं म्हणण्याची वेळ आता आलीय. त्याला कारण म्हणजे राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर सामाजिक वातावरण गढूळ होऊ नये म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी एक आक्रमक, पण सावध भूमिका आणि पॅटर्न निवडला. त्यानुसार सर्व धार्मिक स्थळांसह सर्व ठिकाणच्या भोंग्यासंबंधी परवानगी घेणे बंधनकारक केले. शिवाय तो आदेश तातडीने लागू केला. आता हाच पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्याची तयारी राज्य सरकारचा गृह विभाग करतोय. त्यामुळे राज्यातील कोणत्याही धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर हा योग्य परवानीनेच करता येणार आहे. यासंबंधी निर्णय आज होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलयांची आज डीजीपींसोबत एक बैठक होणार आहे. त्यात ते सर्व आढावा घेऊन सर्व पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांना याबाबत योग्य तो निर्देश देणार आहेत.

नाशिकचा पॅटर्न काय?

नाशिकमध्ये कुठलेही भोंगे लावण्यासाठी सर्व धार्मिक स्थळांनी आणि इतरांनीही येत्या 3 मे पर्यंत परवानगी घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करून हे भोंगे काढले जातील, असे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिलेत. मशीद, मंदिर, गिरीजाघर, चर्च, गुरुद्वारा सर्वच धार्मिक स्थळांसाठी हे आदेश लागू आहेत. या साऱ्या प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यायला 3 मे पर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर जिथे परवानगी नाही, तिथे पोलिसांच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय सर्व ठिकाणी नियमानुसार ध्वनिप्रदूषणाची मर्यादा पाळण्याचा कडक बंधक करण्यात आला आहे.

error: Content is protected !!