डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समतेच्या तत्वावर आधारित असलेला आधुनिक भारत घडवा- डॉ.मुणगेकर

0 66

 

सेलू,दि 18 (प्रतिनिधी) ः
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर देशातल्या नागरिकांच्या समानतेसाठी,समतेसाठी लढा दिला.जनतेचे प्रबोधन केले.दलितांसोबतच सर्वांना सुद्धा समान हक्क या देशात मिळावा यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ उभारली.प्रसंगी आंदोलन केले आणि देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिले.यामुळे समानतेच्या,समतेच्या तत्वावर आधारित आधुनिक भारत घडावा ही भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना होती असे प्रतिपादन भारताच्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य,पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष,माजी खा. माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

समतेचा संदेश देणारे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेच्या वतीने भारताच्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू,पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष माजी खा. प्रा.डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन आज 17 एप्रिल रविवारी सकाळी 11 वा येथील साई नाट्यगृहात करण्यात आले होते.या प्रसंगी डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी
‘ डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आधुनिक भारताची संकल्पना ‘ या विषयावर विस्तृत विचार मांडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ,काँग्रेस कमिटी अनु.जाती सेलचे प्रदेशअध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे,श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणजित गजमल,नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र शिंदे,मुख्य संयोजक परभणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत आदींची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक मिलिंद सावंत यांनी केले.तसेच काँग्रेस अनु.जाती सेलचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनीही मनोगत व्यक्त केले.डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचे व्याख्यान आयोजित केल्याबद्दल सर्वांच्या वतीने मुख्य संयोजक मिलिंद सावंत यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी तर आभार संजय धोंगडे यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!