क्रांतिकारी महात्मा फुले वेशभूषेत यशराज सुनील गायकवाड यांनी सर्वांची मने जिंकली

मी माझ्या पत्नीस शिकवलं तुम्ही तुमच्या मुलीला शिकवा.......या वाक्याने प्रेक्षकांची मने जिंकली

0 61

 

 

◼️शुभंकरोती फाउंडेशन, देसाई फाउंडेशन व श्री के बा विद्यालय, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत भव्य चार दिवशीय उन्हाळी शिबीर

सेलू, प्रतिनिधी – देशात महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडून भारतातील पाहिली मुलींची शाळा काढणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी महिलांना पुरुष प्रधान संस्कृती मध्ये महिलांना बरोबरीचे स्थानावार नेऊन ठेवले त्याच बरोबर बहुजन समाजासाठी क्रांतिकारी कार्य करून जाती व्यवास्थेला झुगारून क्रांतीची मशाल पटेवली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास नव्यापिढीसाठी नेहमी तेवत रहावा म्हणून त्यांची समाधी शोधून प्रथम शिवजयंती साजरी केली.

या त्यांच्या कार्यामुळेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना आपले गुरु मानले.

शुभंकरोती फाउंडेशन, देसाई फाउंडेशन व श्री के बा विद्यालय, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत भव्य चार दिवशीय उन्हाळी शिबीर या शिबीरात अश्या थोर समाजसेवक क्रांतिकारी महात्मा फुले यांची वेशभूषा यशराज सुनील गायकवाड यांनी सादर करून सर्वांची मने जिंकली या प्रसंगी आयोजक तथा मुख्याध्यापक पि एस कौसडीकर , सुभाष नावकर, निशिकांत पाटील, श्रावण भवर, गुलाबराव गायकवाड, जयश्री सोन्नेकर, अल्का धर्माधिकारी, आश्विनी घोगरे, पार्वती गायकवाड ,कृष्णा पांचाळ, सर्जेराव सोळंके,मंगेश कुलकर्णी, नरेश पाटील, दिलीप बेदरकर, अंबादास ईघवे, भगवान यादव, रमेश दोड, प्रशांत ठाकूर,दिपक बनसोडे, सुनील नवले ,अनंतराव तेलभरे, सुनील गायकवाड आदिनी अभिनंदन केले

error: Content is protected !!