मातृशक्तीचा सामना थेट ठाकरेंशी – खा.नवनीत राणा
नांदेड, गजानन जोशी – संतांची,महापुरुषांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मातृशक्तीचा सन्मान करण्याची परंपरा ही आधुनिक काळापासून आहे. परन्तु याच महाराष्ट्रात गत २ वर्षांपासून महिलांवरील अन्याय,अत्याचार,बलात्कार यांचे वाढते प्रमाण यावर सरकारतर्फे कसलीही कठोर भूमिका मांडली जात नसून,महिलांविषयी कडक कायदे अंमलात आणणे असे कोणतेही निर्णय या राज्यात होत नाहीयेत. या राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री ‘कुंभकर्णी’ झोपेत आहेत.
हे संतांचे,महापुरुषांचे हिंदूं चळवळीचे राज्य असून याच राज्यात हिंदुत्वाचे धडे देणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदूंचे आदरस्थान होते,परन्तु या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर हिंदुत्वाची ओळखच मिटवून टाकली.
या राज्यात हनुमान चालीसा पठन करावयाचे असेल तर तुमच्यावर राजद्रोहासारखे गुन्हे दाखल होतील. पोलीस बांधव अशावेळी चोख कामगिरी बजावतील. पण महिलांवर होणाऱ्या अन्याय,अत्याचारावेळी हेच पोलीस बांधव हाताची घडी,तोंडावर बोट ठेवून का बसत असतील! हा संशयास्पद विषय आहे. या पोलीस बांधवांनी जर योग्य पद्धतीने व योग वेळी आपले कर्तव्य बजावले तर नक्कीच या राज्यात अशांततेचे,भीतीचे वातावरण कधीच राहणार नाही.
एका लोकप्रतिनिधीला जर या सरकारने राजद्रोहाचा खोटा गुन्हा नोंद करत जर अटक करून कारागृहात पाठविण्याचे षडयंत्र करविले जात असेल तर या राज्यातील सामान्य जनतेची समस्या ऐकण्यास कोण तयार आहे? त्यांच्यावरही कुठे न कुठे असेच अन्याय अत्याचार हे सरकार करत असेल हे निश्चित. परन्तु या मविआ सरकारने एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, आता जनता माफ नाही करणार कारण जनतेलाही कळले आहे की,हे सरकार आल्यापासून किती भ्रष्टाचार झाले,किती षडयंत्राने लोकप्रतिनिधींना त्रास दिला गेला आणि ते कोनामार्फत कोणाच्या सांगण्यावरून झाले,हे राज्यातील सर्व धर्मीय/जातीय जनतेने पाहिले आहे. त्यामुळे जनतेला लक्षात आले आहे की,याराज्यात मातृशक्तीला किती त्रास दिला जातो. निश्चितच या राज्यातील मातृशक्ती या तीनही पक्षांना त्यांची जागा दाखवेन,त्यामुळे “मातृशक्तीचा सामना ठाकरेंशी होणार!” हा माझा विश्वास आहे…
या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणताही एक जिल्हा/विधानसभा निवडून तिथे जनतेत येऊन निवडणूक लढविण्याचे धाडस करावे,निश्चित तुम्हाला पराभूत करेन हे माझे खुले आव्हान आहे.
–खा.नवनीत राणा