बारव स्वच्छता मोहिमेसाठी बोरकिनीचे ग्रामस्थ सरसावले…

0 100

सेलू,दि 22 (प्रतिनिधी)ः
गावचा प्राचिन वारसा संवर्धनासाठी सेलू तालुक्यातील बोरकिनी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.आज रविवारी सकाळी बारव स्वच्छता मोहिमेचे नारळ आ. मेघना बोर्डिकर यांच्या हस्ते फोडण्यात आले. बोरकिनीचे सरपंच रावसाहेब मुसळे यांच्या पुढाकारातून बारवा स्वच्छतेसाठी सामुहिक श्रमदानास प्रारंभ करण्यात आला आहे.गावाच्या मध्यात प्राचिन बारवा असून आकारमानाने ती जिल्ह्यातील चौथ्या क्रमांकाची बारव आहे.सकाळी सलग तिन तास पंन्नासावर ग्रामस्थांनी बारवेची स्वच्छता करुन पाईपने बारव धुवून घेतली.उद्यापासून आतील गाळ काढला जाणार असल्याचे उपसरपंच रामेश्वर आघांव यांनी सांगीतले.बारव बचाव मोहिमेचा जिल्ह्यात धडाका सुरूच आहे.पेडगांव,मानवत,कासापुरी,वालुर पाठोपाठ बोरकिनी गावात हे अभियान पोहचले आहे.मंगळवारी जिंतूर शहरातील बारवांची स्वच्छता केली जाणार असल्याची माहिती अभियानाचे जिंतूर समन्वयक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय चोरडीया यांनी दिली आहे.

error: Content is protected !!