सामाजिक अर्थसहाय्य योजनेसाठी उत्पन्नाची अट शिथिल करण्याची मागणी

0 51

पुर्णा,दि 24  (प्रतिनिधी) ःनवचेतना महाराष्ट्राच्या वतीने सामाजिक अर्थसहाय्य योजने (निराधार) साठी एकेविस हजार रुपये चे उत्पन्नाची अट शिथिल करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली.
नवचेतना महाराष्ट्राच्या वतीने समाजातील एकल,विधवा ,अपंग, वयोवृद्ध व्यक्तींना निराधार पगार मिळत असते परंतु तहसीलदार पूर्णा यांनी एक पत्र काढून एकेविस हजार रुपये चे उत्पन्न बंद केले आहे यामुळे पूर्णा तालुक्यातील लाभार्थ्यांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे एवढेच काय तर उत्पन्नाच्या नावावर एजंट लोकं गरीब लाभार्थ्यांकडून जास्तीचे पैसे काढण्याचा डाव साधत आहे हे सर्व थांबविण्यासाठी आज नवचेतना महाराष्ट्र के संस्थापक अध्यक्ष राम  भालेराव यांनी  तहसीलदार यांना  एक निवेदन देऊन सदरील आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे अन्यथा उत्पन्न अट शिथिल करण्याचे सांगितले आहे हे आदेश लवकरात लवकर पारित करा अन्यथा तिव्र आंदोलनात समोर जा असा इशारा देण्यात आला आहे

error: Content is protected !!