हिंगणघाट येथे निसर्गसाथी फाउंडेशन तर्फे शून्य सावली प्रयोग
हिंगणघाट,दि 24
निसर्गसाथी फाउंडेशन तर्फे शून्य सावली प्रयोग छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे संपन्न.
आज दिनांक 24/5/22 ला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हिंगणघाट येथे शून्य सावली दिवस निमित्त शून्य सावली चा प्रयोग करण्यात आला.
शून्य सावली हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे. रोज आपल्या सोबत राहणारी ,सोबत चालणारी सावली काही वेळा साठी आपल्याला सोडून दिसेनाशी होते . सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50°दक्षिण आणि उत्तरे कडे असतो. म्हणजेच कर्कवृत आणि मकरवृत ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि शून्य सावली निर्माण होते. ज्या वेळी सूर्य आणि पृथ्वी ह्यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते तिथे शून्य सावली दिवस घडतो. सूर्य दररोज 0.50°सरकतो म्हणजे तो एकच अक्षवृतावर 2 दिवस राहतो,त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते. निसर्गसाथी फाउंडेशन चा वतीने पाईपावर प्रयोग करून शून्य सावली दाखवण्यात आली .दुपारी 12 वाजून 12 मिनिटाला शून्य सावली निर्माण झाली .यावेळी निसर्गसाथी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रविण कडू , नियाजुद्दीन सिद्दीकी ,सुलभा कडू, अर्चना मिटकर मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.