ज्ञानोपासक शिक्षण मंडळ आयोजित महिला योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

0 109

परभणी,दि 22ः
भाजपा परभणी जिल्हा उपाध्यक्ष समीर गणेशराव दुधगांवकर यांच्या पुढाकाराने ज्ञानोपासक शिक्षण मंडळ आयोजित महिला योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
समीर दुधगांवकर यांच्या पुढाकाराने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या वतीने 22 जून रोजी खास महिलांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास विश्वविक्रमकर्त्या योगाचार्य डॉ. प्रज्ञा पाटील मार्गदर्शक होत्या. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये सलग 103 तास योग करण्याचा विक्रम करणार्‍या डॉ प्रज्ञा यांच्या नावे आहे.
सकाळच्या सत्रात ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी च्या सांस्कृतिक सभागृहात हे शिबिर संपन्न झाले. परभणी, बोरी तसेच जिंतूर या तीन ठिकाणी हे शिबिर घेण्यात आले.यावेळी बोलताना महिलांनी वेळात वेळ काढून आपल्या आरोग्यासाठी नियमित योग साधना करावी असे आवाहन डॉ. प्रज्ञा यांनी केले. यावेळी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.दुपारच्या सत्रात ज्ञानोपासक विद्यालय बोरी येथे योग शिबीर पार पडले, या योग शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.सायंकाळच्या सत्रात ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर या ठिकाणी देखील योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी उपप्राचार्य एम. एस. दाभाडे यांची उपस्थिती होती.या सर्व योगशिबिरास समीर गणेशराव दुधगांवकर, प्राचार्य बाबर सर, प्राचार्य डॉ. श्रीधर भोम्बे, दुर्गा देशमुख मॅडम, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!