सेलूत कापूस निगमच्या खरेदीचा शुभारंभ
सेलू,दि 21 ः
बुधवार रोजी भारतीय कपास निगम लि. शाखा. सेलू.च्यावतीने येथील मधुसूदन जिनिग येथे आज कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी श्री. श्याम बाबुराव खरात यांच्या कापसाला प्रती क्विंटल 8361/- दर देण्यात आला. त्या प्रंसगी भारतीय कपास निगम लि.शाखाचे केंद्र प्रभारी श्री. शंकरलालजी गलगट तसेच मानवत शाखेचे केंद्र प्रमुख श्री. निलेशजी लांजेवार, दयानंद सांळुके, बाजार समितीचे सचिव आर. आर. वाघ, सहाय्यक सचिव बि.एस. ताठे, मधुसूधन जिनिंगचे मालक श्री ब्रिजगोपाल काबरा, श्याम काबरा, विष्णू मोरे, सुबोध देशमुख, अशोक वाटोडे इत्यादी कापूस खरेदी दरम्यान उपस्थित होते.