हमीभाव कायदा लागू करण्यासाठी सरकारवर दबावाची गरज-राजू शेट्टी
परभणीत स्वाभिमानीतर्फे आयोजित एम.एस.पी गॅरंटी परिषद संपन्न
परभणी,दि 12 (प्रतिनिधी)ः हमीभाव कायदा लागू झाला तरच शेतकर्यांची प्रगती शक्य आहे,शेतीमालासाठी हमीभाव कायदा कायदा लागू करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे.असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये रविवारी (दि.12) आयोजित एम.एस.पी.गॅरंटी परिषेदेत ते बोलत होते. यावेळी एमएसीपी गॅरंटी किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदार व्ही.एम. सिंग,अॅड. रामराजे देशमुख, डॉ.प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भगवान शिंदे,केशव आरमळ, सैन्यदलातील जवान प्रदीप राजभोज, ज्येष्ठ शेतकरी गंगाधर खटींग आदीची उपस्थिती होती.
आपल्या भाषणात श्री.शेट्टी यांनी हमीभाव कायदा लागू झाला तरच शेतकर्यांची प्रगती शक्य आहे असे सांगत शेतीमालासाठी हमीभाव कायदा कायदा लागू करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे. प्रत्येक गावातील ग्रामसभेत ठरावा घ्यावे लागतील. हमीभाव कायद्याबाबत शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहिम राबविली जात आहे. हमीभाव कायदा शेतकर्यांच्या प्रगतीसाठी महत्वाचा आहे, असे स्पष्ट केले.
शेट्टी म्हणाले,शेतकर्यांच्या संघटनांनी हमीभाव कायद्याचा मसुदा तयार केला आहे.त्यात कृषी मुल्य आयागोला स्वायत्त दर्जा देण्याची तरतूद आहे. या आयोगाचा अध्यक्ष कृषी अर्थशास्त्रातील जाणकार शेतकरी असेल.सदस्यामध्ये देखील शेतकरी चळवळीतून कृषी अर्थशास्त्राचा अभ्यास असलेल्या कार्यकर्त्याचा समावेश असेल.या देशातील दोन व्यक्तीच्या उत्पन्नात निर्माण झालेली असमानता कमी करण्याचे काम संसदेचे आहे.
कृषी मुल्य आयोग विविध राज्यातील शेतकर्यांच्या शेतावर जाऊन उत्पादन खर्चावर प्रभावर टाकणार्या घटकांचा अभ्यास करुन हमीभाव निश्चित करेल.त्यानुसार शेतकर्यांना चांगला परतावा मिळू शकेल.देशातील 85 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत.या शेतकर्यांना सुखी,समाधानी, सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी हमीभाव कायदा लागू करण्याची गरज आहे.सिंह म्हणाले,शेती जिवंत ठेवायची असेल तर हमीभावाचा कायदा करुन लागू करण्याची गरज आहे.देशमुख म्हणाले,शेतीमाला हमीभाव दिला तरच शेती आणि शेतकरी टिकून राहतील.
श्री. सिंग म्हणाले, शेतीकडे दुर्लक्ष करू नका. सरकारला हमीभावाचा कायदा करावाच लागणार आहे. जोपर्यंत सरकार शेतकर्यांच्या पिकाला हमीभावाचा कायदा करून देत नाही तोपर्यंत अशीच आमची लढाई सुरू राहील. आपल्याला हमीभाव कायद्यासाठी प्रत्येक गावागावांत बैठका घेऊन ठराव घ्यावा लागेल. किशोर ढगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवानराव शिंदे ,पंडितअण्णा भोसले,भास्कर खटिग, रामेश्वर आवरगंड, मुंजाभाऊ लोंढे, पी. टी. निर्वंळ, प्रसाद गरुड, भगवानराव गरूड, बाळासाहेब घाटोळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.