विठ्ठलाचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना कारण…

0 385

 

मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेले आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेऊन दिल्लीला रवाना झाले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा दिल्लीला जात असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संयुक्तपणे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. येणाऱ्या काळात लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे.

 

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडणार आहेत. दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडण्याची शक्यता आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. ही बैठक आजच पार पडण्याची शक्यता आहे. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चर्चा होऊ शकते. येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 2 किंवा 3 खासदरांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्याताही सूत्रांनी व्यक्त केली आहे. एक कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

‘हे’ महत्वाचे विषय ?
मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेनुसार विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत दिल्ली स्तरावर हालचाली सुरू आहे. त्यामुळे निवडणुका कधीही लागू शकतात, अशी चर्चा आता रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आहे. नार्वेकर यांनी आयोगाकडून शिवसेनेची घटना मागवली आहे. या घटनेचा अभ्यास करून 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाणार आहे. यावर सल्ला मसलत करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याची चर्चा रंगली आहे.

error: Content is protected !!