मंत्रीमंडळ विस्ताराची सुनील तटकरे यांनी सांगीतली तारीख

0 25

अजित पवार बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असले, तरी त्यांच्यासह बंडखोर गटाचे ९ मंत्री अद्यापही विनाखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळेच खातेवाटप व मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी तारीखच जाहीर केली आहे.

सुनील तटकरे म्हणाले, “राज्याचं मंत्रीमंडळ स्थापन झाल्यापासून अजित पवार दिल्लीला गेलेले नाहीत. हा काही तिढा नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आम्ही कधीही आग्रही नव्हतो. ज्यावेळी एकत्रितपणे काम करायचं ठरलेलं असतं त्यावेळी त्याबाबतची जाणीव मनात ठेऊन काम करणं गरजेचं असतं.

”मला वाटतं की, याबाबतचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या स्तरावर घेतील आणि आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर एकजुटीने काम करण्यासाठी बरोबर आहोत. उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराबाबत निर्णय झालेला तुमच्यासमोर येईल,” असंही सुनील तटकरेंनी नमूद केलं.

error: Content is protected !!