मुळी परिवाराने उभ्या केल्या मातीच्या महालक्ष्मी मूर्ती

0 178

 

सेलू / नारायण पाटील – हिंदू साठी अत्यंत महत्वाचा म्हणजे महालक्ष्मी सण आहे .घरोघरी सध्या महालक्ष्मी चा हा सण उत्साहात सुरू आहे .यामध्ये कोणाकडे सुगड्यावरील तर कोणाकडे कोथळ्या वर या महालक्ष्मी उभ्या केल्या जातात .व त्यांची अत्यंत मनोभावे पूजन केले जाते . येथील नरसिंह मंदिर मधील राधाकृष्ण मुळी यांच्याकडे मात्र महालक्ष्मी मातीच्या उभारण्याची परंपरा आहे .

 

गोदा काठी असलेल्या रामपुरी येथील सर्वच मुळी परिवाराकडून ही परंपरा अजूनही जपली जात आहे .
यासाठी स्वहस्ते शेतातील काळी माती ( वावरी ) आणून त्याचा घट्ट गारा ( चिखल ) तयार केला जातो .व या चिखलाचे घट्ट गोळे एकावर एक चढवून त्यापासून महालक्ष्मी उभी केली जाते .त्यामध्ये काठी आडवी लावून त्यावर गोळे लावून महालक्ष्मीचे हात देखील बनवले जातात .अर्थात यासाठी त्यांच्या कुटूंबातील सर्वच व्यक्तींना खूप कष्ट घ्यावे लागतात .अशा प्रकारे महालक्ष्मी बनवण्याची कला देखील कांही ठराविक व्यक्तिकडेच असते .व बाकी कुटूंबीय त्यांना यासाठी मदत करतात .पूर्ण महालक्ष्मी उभी राहिल्यानंतर तिला कापड गुंडाळून त्यावर व्यवस्थित साडी नेसवली जाते .व मगच पूर्ण शृंगार चढवला जातो .या महालक्ष्मीचे मुखवटे देखील स्वहस्तेच तयार केलेले असतात .हे विशेष
मुळी परिवारात ही प्रथा मागील कित्येक पिढ्यानपिढ्या चालू आहे .अशा प्रकारे निसर्गातील माती वापरून तयार करण्यात येत असलेल्या महालक्ष्मीचे सर्वजण कौतुक करतात

error: Content is protected !!