विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अभ्यासाबरोबरच खेळ देखील आवश्यकच-डॉ संजय रोडगे
सेलू / नारायण पाटील – सध्याच्या स्पर्धेच्या काळात अधिकाधिक मुले व पालकही अभ्यासावरच जास्त लक्ष केंद्रित करत आहेत परंतु शरीर आणि मन सुदृढ असेल तरच अभ्यासात प्रगती करता येते, म्हणून म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती साठी अभ्यासा बरोबरच मैदानावर खेळनेही ही आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ.सजंय रोडगे (श्रीराम प्रतिष्ठान अध्यक्ष)यांनी केले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृतमहोस्तव निमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय परभणी, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ता. १८ सप्टेंबर रोजी प्रिन्स अकॅडमी सेलू येथे आयोजित जिल्हा स्तरीय शालेय सॉफ्टबॉल व सेलू तालुका क्रीडा स्पर्धा मराठवाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन करण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राम प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ संजय रोडगे होते , उद्घाटक म्हणून गटविकास अधिकारी गणेश मंडलिक होते. प्रमुख पाहुणे संजय मुंढे (राज्य खो-खो मार्गदर्शक) जिल्हा सचिव प्रा.प्रसेनजित बनसोडे , तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, केंद्र प्रमुख भित्ते, प्रशांत नाईक उपस्थित होते.
या स्पर्धेत जिल्ह्यातील १४,१७ व १९ वर्षे आतील मुले व मुलींच्या सहभाग नोंदवला.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे , सुत्रसंचालन जुलाह खुदूस,तर सुरज शिंदे यांनी आभार मानले.
शालेय जिल्हा सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचा अंतिम निकाल:-
१४ ,१७ वर्षे मुले गटात प्रथम : नूतन विद्यालय सेलू,
१४ मुले व्दितीय: जिल्हा परिषद प्रा.शा. पोरवड, परभणी .
१७ मुले व्दितीय: हॉली इंग्लिश स्कूल जिंतूर,
१४,१७ वर्षे मुली: प्रथम: नूतन कन्या प्रशाला सेलू, व्दितीय:
१४ मुली व्दितीय: जिल्हा परिषद प्रा.शा.पोरवड, परभणी
१९ वर्षातील मुले: हॉली इंग्लिश स्कील जिंतूर,
सेलू तालुका व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा अंतिम निकाल:
१४ वर्षे मुले: प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू , व्दितीय: ज्ञानतिर्थ विद्यालय सेलू,
१४ वर्षे मुली: प्रथम प्रास्परस इंग्लिश स्कुल सेलू,
१७ वर्षे मुले: प्रथम: नूतन विद्यालय सेलू, व्दितीय: प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू,
१७ वर्षं मुली : प्रथम : व्हिजन इंग्लिश स्कूल सेलू,
१९ वर्षे मुले/मुली प्रथम : प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू, व्दितीय: शांताबाई नखाते आ.शा. वालूर
पंच म्हणून, जगदीश लहाने, स्वप्निल चव्हाण, संजय भुमकर, संतोष शिंदे, जुलाह खुदूस , निलेश माळवे, अभिषेक चव्हाण, पार्थ जावळे, सत्यम बुरकुले, यांनी काम पाहिले.