भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकप फायनलच्या पिचबाबत सर्वात मोठी अपडेट

0 98

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३च्या फायनल लढतीची उत्सुकता सर्वांना लागली आहे. एका बाजूला स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आणि दुसऱ्या बाजूला पाच वेळा विजेता झालेला संघ अशा अव्वल टीममध्ये ही लढत होत आहे. रविवारी १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
क्रिकेट मॅचमध्ये नाणेफेक ही फार महत्त्वाची ठरते. मैदानावरील कामगिरी सोबत अनेक संघाचे नशिब टॉसवर देखील ठरते. अनेक वेळा तर अशी परिस्थिती असते की टॉसच्या वेळीच नक्की होते की कोणता संघ विजयी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल मॅचच्याआधी खेळपट्टीसोबत सर्वाधिक चर्चा होत आहे ती टॉसवरून, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंन्स यांनी टॉस जिंकल्यावर कोणता निर्णय घ्यावा?
नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकूण ११ पिच आहेत. आतापर्यंत हे स्पष्ट झाले नाही की कोणत्या पिचवर फायनल मॅच होणार आहे. पण ही गोष्ट स्पष्ट आहे की, मॅच अशा पिचवर होईल जेथे फिरकीपटूंना मदत मिळेल. पिचवर चेंडू चांगला वळेल. अशा परिस्थितीत टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण सामना जस जसा पुढे जाईल तसे फलंदाजी करणे अवघड होईल. कोलकाता येथील इडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये असेच झाले होते.
क्रिकेटमध्ये नेहमी असे म्हटले जाते की, मोठ्या लढतीत प्रथम फलंदाजी करावी. कारण लक्ष्याचा पाठलाग करताना अनेकवेळा जास्त दबाव येतो. १९८३ साली भारताने १८३ धावा करून विजेतेपद मिळवले होते. २०१९ साली इंग्लंडला आक्रमक फलंदाजी असताना देखील २४२ धावा करता आल्या नव्हत्या. अखेर मॅच टाय झाली आणि सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. त्यामुळे २०२३च्या फायनलमध्ये दोन्ही कर्णधार टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतील.

error: Content is protected !!