पाथरी शहरात कडकडीत बंद,ओबीसी समाजाकडून काढली रॅली
रमेश बिजुले
पाथरी,दि 15
मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्याना तात्काळ आळा घालावा, तसेच गोपिचंद पडळकर यांच्यावर इंदापुर येथे झालेल्या चप्पल फैक प्रकरणी तपास करून सदर व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. अशी मागणी करत ओबीसी बांधवांच्या वतीने दि. 15. रोजी पाथरी शहरात कडकडीत बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे,
ओबीसी समाजाचे नेते आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दि.15 रोजी पाथरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.व्यापाऱ्यांनी सकाळी आठ वाजता पासून आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. तसेच सेलू कॉर्नर येथे एकत्र येऊन पाथरी शहरात बंद करण्यात आले आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
आ. पडळकर यांच्यावरील हल्लयाच्या निषेधार्थ शुक्रवारी पाथरी शहरात बंद व आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभुमीवर शहरासह तालुक्यातून समाज बांधव सकाळी एकत्र जमण्यास सुरूवात झाली. यावेळी पाथरी शहरात . त्यानंतर येथूनच निषेध रॅली काढण्यात आली. सेलू कॉर्नर ही रॅली बस स्टॅण्ड . बस स्टँड येथे रॅली करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.संबंधितांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही सकल ओबीसी वतीने करण्यात आली.यावेळी बहुसंख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होता.