क्युरिअस किड्स प्रि स्कूलमध्ये ”वैयक्तिक नृत्य” स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सेलू / नारायण पाटील – क्युरिअस किड्स प्रि स्कूलमध्ये १६ डिसेंबरला मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ”वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे आयोजन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी केले होते. या स्पर्धेत क्युरिअस किड्स प्री स्कूल, फिनकिड्स प्री स्कूल , जिज्ञासा बालविहार, ज्ञानतीर्थ बालवाडी या शाळेतील चिमुकल्याने मोठया संख्येने सहभाग नोंदवला.
आजच्या या चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठान सेलू चे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे सचिव डॉ सविता रोडगे,प्रमुख पाहुण्या रूपा ठाकूर बीजेपी महिला तालुका अध्यक्ष,बबिता ठाकूर बीजेपी महिला जिल्हा सरचिटणीस,निर्मला लिपने सामाजिक कार्यकर्त्यां व परीक्षक कीर्ती राऊत मॅडम, एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, प्रॉस्परस पब्लिक स्कूल प्रिन्सिपल प्रगती क्षीरसागर, ज्ञानतीर्थ विद्यालय मुख्याध्यापिका शालिनी शेळके यांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली.
या क्युरीअस किड्स आयोजित वैयक्तिक नृत्य स्पर्धेत चिमुकल्यानी देशभक्ती पर गीत, महाराष्ट्रातील लोकधारा, हिन्दीतील चित्रपटातील गीतांवर सुंदर नृत्य सादर केली या मध्ये छम छम, मेरे ‘पापा, माझ्या पप्पा नी गणपती आणला, ऐ देश मेरे, शरारा शरारा ई गीतावर बहारदार नृत्य सादर केली.
या वैयक्तिक नृत्य स्पर्धेत क्युरियस किड्स प्रथम ओजश्वि चौरे, द्वितीय वैभवी कडभाने, तृतीय अरनेश नाईकनवरे, उत्तेजनार्थ अदिती रोडगे यांना पारितोषिक मिळाले.
फिन किड्स मधून प्रथम अन्विता ढोके, द्वितीय रिधिमा लिपणे, तृतीय वरद महाजन, उत्तेजनार्थ स्वानंद डाखोरे व शाम्भवी बोराडे यांनी पारितोषिक मिळवले.
जिज्ञासा बालविहार मधून प्रथम सर्वज्ञ ताठे, द्वितीय काव्य पवार व ज्ञानतीर्थ बालवाडी मधून प्रथम मनश्री रोडगे, द्वितीय स्वप्नजा मोरे, तृतीय सायली गुंडाप्पा व उत्तेजनार्थ वृत्तिका चव्हाण यांना पारितोषिक मिळाले.
केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान विविध सांस्कृतिक उपक्रमातून प्रयत्नशील असते. या वैयक्तिक नृत्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.