अतिप्राचीन असलेल्या खंडोबा मंदिरचा भूमिपूजन सोहळा
सेलू / नारायण पाटील – शहरातील शाहू मध्ये असलेल्या अतिप्राचीन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा मंदिर च्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन चंपाषष्ठी चे औचित्य साधून दि १८/१२/२३ सोमवार रोजी सकाळी १० वाजता संपन्न होत आहे .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा बँकेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर हे राहणार असून माजी आमदार हरिभाऊ काका लहाने हे प्रमुख पाहुणे आहेत .
यावेळी प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश बिहानी ,माजी प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी ,गजानन कृपा कोचिंग क्लास चे संतोष कुलकर्णी,प्रसिद्ध शेतकरी विष्णुपंत शेरे व अशोकराव वाडकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे .
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परंतु विकासासाठी अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या या खंडोबा मंदिराचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी होती .व याबाबत पुढाकार घेऊन माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी प्रयत्न करून या कामासाठी निधी मंजूर करून घेतला आहे .
या कामातील संरक्षक भिंत व रस्त्याच्या कामांना या दिवशी सुरुवात होणार असून उर्वरित कामे देखील लवकरच पूर्ण केली जाणार आहेत .
तरी या भूमिपूजन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संदीप लहाने व खंडोबा मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यांत आले आहे