नरसिंह मंदिरमध्ये रामरक्षा व हनुमान चालीसा पठण व महाआरती
सेलू / नारायण पाटील – आज अयोध्येत प्रभू रामचंद्राची मूर्ती स्थापना होत असल्याचे औचित्य साधून येथील पांडे गल्ली मधील नरसिंह मंदिर मध्ये भागवताचार्य दत्ता महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व अमोघ वाणी मधून सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण करण्यात आले .तसेच बापजी यांनी यावेळी हनुमान चालीसाचे देखील पठण केले .व यानंतर प्रभू रामचंद्राची महाआरती भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आली . मंदिर चे पुजारी देविदास पाटील यांच्या कडून यावेळी उपस्थित सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
प पू माधवाश्रम स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात आयोजित भागवत कथेची समाप्ती झाल्यानंतर भागवत ग्रँथाची मिरवणूक केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर मधून पांडे गल्ली मधील नरसिंह मंदिर पर्यंत काढण्यात आली होती .यावेळी महिला व पुरुष भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते .ही भागवत ग्रँथाची मिरवणूक नरसिंह मंदिर मध्ये आल्यानंतर देविदास पाटील व सारिका पाटील यांनी ग्रँथाचे तसेच प पू दत्ता महाराजांचे स्वागत केले .व त्यांनतर हा रामरक्षा , हनुमान चालीसा पठण व महाआरती चा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी या भागवत कथा कार्यक्रमाचे मुख्य यजमान श्रीधरराव कुऱ्हाडकर सपत्नीक व त्यांच्या कुटूंबियासह उपस्थित होते
यानंतर शहरातील अत्यंत पुरातन असलेल्या ब्राम्हण गल्ली तील राम मंदिर मध्ये देखील बंडू देवधर व राम मंदिर संस्थान च्या वतीने दुपारी १२ वाजता रामरक्षा पठण व महारतीचा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी देखील रामभक्ताची उपस्थिती लक्षणीय होती.