अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप,आंदोलन संपवण्याचा घाट-मनोज जरांगे पाटलांचा कडाडून हल्लाबोल

0 234

अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली. अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट असल्याचा घणाघातही जरांगे पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरून केला.

जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवू नका, हे पाप तुम्हाला फेडावे लागेल. महाराजांची बदनामी होईल, समाजाचे नुकसान करू नका. हा सरकारचा ट्रॅप आहे. अजय बारसकर यांच्यासोबत आणखी 10 ते 15 माणसं आहेत, जे मला बदनाम करण्याचा विचार करत आहेत. यामागे पूर्णपणे सरकारचे षडयंत्र आहे. बारसकर यांना काही तरी मिळवायचे आहे, त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मी असल्या चिल्लर महाराजांना मानत नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी बारसकर महाराज यांच्यावर केला.

error: Content is protected !!