सेलूतील कलाकाराच्या गिताला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
सेलू / नारायण पाटील – पेशाने शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद यांचा मुलगा शेख राहिल याने लिहिलेला व त्याची मुख्य भुमिका असलेला गित एक वादा या म्युझिकल व्हिडिओला फिल्म एज्युकेशन ॲन्ड वेल्फेअर फाऊंडेशन औरंगाबाद प्रस्तुत रिल्स इंटरनेशनल फेस्टिवल २०२४ स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बेस्ट म्युझिक व्हिडिओ पुरस्कार घोषित झाला आहे.
सदरील स्पर्धेत जगभरातील १३५० पेक्षा अधिक म्युझिक व्हिडिओंच्या प्रवेशिका प्रविष्ट झाल्या होत्या. सद्या संभाजीनगर येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला शेख राहिल हा इयत्ता १० वी मध्ये शिकत असतांनाच लघुपटाच्या माध्यमाने अभिनय व पटकथा, गीत लेखन करत आहे. आतापर्यंत त्याला विविध लघुपटातील भुमिका व लेखना करीता अनेक पुरस्कार मिळालेले आहे. शेख राहिलच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.