सर्वांना सोबत घेवून चालण्याची शिकवण इस्लाम धर्म देतो -मौलाना मूखतदिर
सेलू ( नारायण पाटील)
कोणत्याही धर्माचा अथवा व्यकतीचा अपमान न करता सर्वांना सोबत घेवून चलावे सर्व मानव जात एकच असून मानवाच्या कल्याणाची शिकवण इस्लाम धर्म देते असे प्रतीपादन मजलिसे एहरार चे नाजीम मौलाना मूफती मूखतदिर यांनी केले.
येथिल मदिना मस्जीद येथे मजलिसे एहरार इस्लाम हिंद च्या वतिने ऐका धार्मीक कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमूख अतिथी म्हणून मोफती तलहा,मौलान खाॅजा,अब्दूल वहिद,सलिम देशमूख सह शहरातील सर्वच मौलाना मंडळीची मोठया प्रमाणात हाजरी होती.
या वेळी पूढे बोलतांना मौलाना म्हणाले की भारताच्या स्वातंञ्य लढाईत मजलिसे एहरार या संघटनेचा खूप मोठा योगदान असून अनेक जणांनी व कितेक ऊलमानी देशा साठी आपल्या प्राणांची अहूती दिली.पण दूरदैवांनी खरे चिञ देश समोर न मांडता वेगळीच भूमीका मांडली जाते परंतू आपण सर्वांनी इतिहासाचा खरा अभ्यास केला तर सत्य परिस्थीती सर्व समोर येइल मानवता बंधूभाव व सर्वांना सोबत घेवून चालणे हिच इस्लाम धर्माची खरी शिकवण असून मूस्लीम समजाने याचे तंतोत पालन करने गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालूकाअध्यक्ष मोहम्मद याहिया खाॅन यांनी केले तर सूञसंचलन मौलाना जाकेर यांनी केले तर आभार सय्यद इम्रान यांनी मानले.