विकास कामांना कायम प्राधान्य देणार – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे
गंगाखेड प्रतिनिधी:-
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न कैक वर्षापासून प्रलंबित आहेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासह समाजोपयोगी विविध विकास कामे करणेही तितकेच गरजेचे आसल्याचे मला माहीत आहे. त्यामुळेच जनतेच्या कामाप्रती असलेली माझी बांधिलकी मी कधीही विसरू शकत नाही. म्हणून मी विकास कामांना कायम प्राधान्य देत आलो आहे आणि भविष्यातही देत राहणार. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये आपण मला आपला सेवक म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. म्हणून मी अविरतपणे जनतेची कामे करत असल्याचे मत आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी तालुक्यातील मौजे बोथी येथे आयोजित इसाद – बोथी – राणीसावरगाव राज्य महामार्गाच्या विकास कामाच्या भूमिपूजन सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
इसाद – बोथी – राणीसावरगाव हा रस्ता अत्यंत खराब झाला असल्या कारणाने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत होती. ही बाब गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या निदर्शनास आली. अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये इसाद बोथी राणीसावरगाव या रस्त्याच्या विकास कामाकरीता निधी मंजूर व्हावा या करीता त्यांनी सतत पाठपुरावा ठेवला. याचे फळस्वारुप म्हणून राज्य शासनाने सदर रस्त्याच्या विकास कामाकरीता तीन कोटी रुपये निधी मंजूर केला. या रस्त्याच्या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आ.गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झाला.
इसाद ते राणीसावरगाव राज्य महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असून परभणी लातूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा दुवा आहे. आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या पाठपुराव्यामुळे या महामार्गाच्या विकास कामाला निधी मिळाला असून काही दिवसात या महामार्गाचे रूप बदलताना आपणास दिसणार असल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
या उद्घाटन सोहळा प्रसंगी परभणी जिल्हा परिषदचे माजी सभापती शिवाजीराव निरदुडे, ह.भ.प. विलास महाराज गेजगे, तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, तालुका अध्यक्ष रामप्रसाद सातपुते, अल्ताफ शेख, बोथी गावचे सरपंच उत्तमराव झुबरे, उपसरपंच दिगंबर गेजगे, भास्करराव ठवरे, संचालक तथा राणीसावरचे सरपंच माऊली जाधव, साहेबराव ठवरे, युवक तालुका अध्यक्ष बालाजी लटपटे, धोंडीराम कुंडगीर, राहुल बनाटे, ह.भ. प. ज्ञानोबा महाराज कुंडगीर, समाधान चिलगर, गोविंद डोने, दीपक तापडिया यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.