श्रीराम प्रतिष्ठान येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
सेलू,दि 28 ः
येथील श्रीराम प्रतिष्ठान सेलू येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोध निबंध रामन परिणाम हा नेचर या मासिकाला परिषदेसाठी पाठवला होता. यावर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन स्वदेशी तंत्रज्ञान विकसित भारतासाठी ही थीम केंद्र सरकारने ठेवली आहे.
आज या कार्यक्रमाची सुरुवात सी व्ही रमण व डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने डॉ संजय रोडगे यांच्या हस्ते झाली.त्यानंतर विज्ञान गीत शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, शालिनी शेळके, श्रीराम प्रतिष्ठान मधील सर्व विज्ञान शिक्षक व शाळेतील विद्यार्थी आज वैज्ञानिक वेशभूषेत उपस्थित होते.
आज या राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मुख्य आकर्षण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जादूगर शिवम यांनी श्री गणेश वंदना करतेवेळी पूजेचे साहित्य जादूने तयार केले व डॉ संजय रोडगे यांचे स्वागत जादूने तयार केलेल्या हार व पुष्पगुच्छाने केले ई. प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले. व विद्यार्थ्यांना हे प्रात्यक्षिक कसे करतात याचेही मार्गदर्शन शिवम जादूगार यांनी केले. तसेच प्रा संजय टीकारिया ‘चला करूया प्रयोग’ या सदराखाली विद्यार्थ्यांना विविध विषयावरील प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखवले.
आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनात एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू प्रॉस्पपेरीयस पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या विज्ञान प्रदर्शनात एकूण 142 विज्ञान प्रतिकृतीचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. यामध्ये ऑर्डीनिओ आधारित प्रतिकृती, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आरोग्य, आधुनिक शेती, ट्रान्सपोर्टेशन ई विषयावर विद्यार्थ्यांनी प्रतिकृती तयार केल्या होत्या. यासोबत वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पावर पॉइंट प्रेझेंटेशन यामध्ये एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण अपूर्वा पॉलीटेक्निक येथील प्राध्यापक गजानन जाधव सर,अशोक बोडके , मोरे, वाघ, इंगोले व कोल्हे ,खोसे यांनी केले.
संजय टिकारिया यांनी ‘चला करूया प्रयोग ‘हा विज्ञान प्रयोगवरील कार्यक्रम सादर केला. यामध्ये विविध प्रयोगांचे सादरीकरण केले.आजचा युग हा विज्ञानाचा युग आहे. माणसाच्या सर्व हालचाली सर्व काम विज्ञानामुळेच संभव आणि सोपे झाले आहेत.असे मार्गदर्शन केले.
आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात.चमत्कार अशी कुठलीही गोष्ट नसते त्यामगे विज्ञान असते असे आपल्या सादरीकरणातून शिवम जादूगार यांनी सांगितले.
विज्ञान हा भारतीय संस्कृतीचा कणा. ऋग्वेदातही याला विज्ञानम संबोधले आहे. मानवी जीवन सुखी होणे हाच आमच्या विज्ञानाचा उद्देश. मानवी जीवनात सुखी करणारे हे विज्ञान. आमच्या वैज्ञानिकांनी त्यांचे प्रयोग हे केवळ मानवी कल्याणासाठीच केलेत. असे प्रतिपादन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी केले.
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल सरकटे यांनी केले, सूत्रसंचालन कल्पना भाबट तर आभार प्रदर्शन हरीश कांबळे सरांनी केले.
कार्यक्रम यशस्वी ते करिता श्रीराम प्रतिष्ठान येथील सर्व घटक संस्थेतील सर्व कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.