मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा

0 61

सेलू,दि 28ः
सकल मराठा समाज सेलूच्या वतीने मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना उपजिल्हाधिकारी कार्यालय सेलू यांच्या मार्फत आज दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी, उपजिल्हाधिकारी कार्यालय सेलू येथे मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी अडवणूक केली जात आहे असे निदर्शनास आले आहे. मराठा कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी सेलू व जिंतूर या तालुक्यातील मराठा बांधव उपजिल्हाधिकारी सेलू येथे हेलपाटे मारून त्रस्त झाले आहेत काही ना काही कारण काढून व त्रुटी काढून मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे लोकांनी आपल्या कार्यालयात विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. वारंवार जिल्हाधिकार्यालय परभणी व उपजिल्हाधिकारी सेलू येथे लेखी व तोंडी निवेदने देऊन काहीही फरक पडला नाही मराठा समाजाला मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी मुद्दामहून प्रशासनातर्फे वेठीस धरले जात आहे असा याचा अर्थ निघतो. याचा निषेध म्हणून दिनांक 04-03- 2024 सोमवार पासून उपजिल्हाधिकारी कार्यालय, सेलू येथे सकल मराठा समाज सेलू व जिंतूर च्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याची प्रशासनाने नोंद घ्यावी…
यावेळी जयसिंग शेळके, विठ्ठल जाधव, बळीराम चव्हाण, पांडुरंग कदम, शिवहरी शेवाळे, सोमेश्वर गजमल, राजेंद्र गाडेकर,गणेश शेवाळे, किशोर गात, जिवाजी कवडे, सतिश आकांत व सकल मराठा समाज बांधव सेलू तालुका उपस्थित होते…

error: Content is protected !!