सेलूत शनिवारी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे व्याख्यान

0 83

सेलू ( नारायण पाटील)

येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था व बी.बी.बिहाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे शहरातील श्रीसाई मंदीरात शनिवार ( दि. ०२ ) मार्च रोजी सायंकाळी ०६.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.
नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालाचे ४७ वे पुष्प श्रीराम जन्मभूमी न्यास, श्रीक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविन्ददेव गिरीजी महाराज ‘ जीवन साफल्य ‘ या विषयावर गुंफनार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया हे असतील. अशी माहिती श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी दिली. व्याख्यानमालेच्या यशस्वीसाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात व्याख्यानमालेचे सहसंयोजक प्रा. सुभाष बिराजदार आणि विविध समित्या परिश्रम घेत आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!