सेलूत गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन

0 105

सेलू,दि 29 ः
श्री संत जगद्गुरू गजानन महाराज यांच्या तीन दिवसीय प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन सेलूतील स्वामी विवेकानंद नगर मधील गजानन महाराज मंदिर मध्ये करण्यात आले आहे .
दि १ मार्च पासून या प्रगट दिन सोहळ्यास प्रारंभ होत असून दि ३ मार्च रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे .
यामध्ये दररोज सकाळी ५ ते ८ यावेळेत श्री च्या मूर्तीस भक्तांचे अभिषेक होणार असून ८ ते ११ यावेळेत श्री गजानन विजय या ग्रँथाचे सामूहिक पारायण होणार आहेत .दुपारी ३ ते ४ या वेळेत महिला मंडळाचे भजन होणार आहे .
३ मार्च या मुख्य दिवशी सकाळी ५ ते १० यावेळेत श्री च्या मूर्तीस भक्तांकडून अभिषेक होणार असून ८ ते १० या दरम्यान श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण होणार आहे .तसेच सकाळी १० ते ११ यावेळेत श्री च्या मूर्तीस महाअभिषेक होऊन ११ ते दीड यावेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार व भागवताचार्य ह भ प बाळू महाराज गिरगावकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे .व त्यानंतर महाआरती होऊन दुपारी २ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून श्रवणाचा ,दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी मंडळ ,गजानन महाराज मंदिर तसेच स्वामी विवेकानंद नगर ,रहिवाशांच्या वतीने करण्यात आले आहे .

error: Content is protected !!