सहाय्यक निबंधक  माधव यादव यांचा धनलक्ष्मी बँकेच्या वतीने सत्कार

0 34

सेलू / नारायण पाटील – साहेब मागील साडेचार वर्षांपासून सेलू येथे कार्यरत असलेले सहाय्यक निबंधक माधव यादव यांचा नुकताच धनलक्ष्मी बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला . सेलू येथील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची नुकतीच हिंगोली येथे सहाय्यक निबंधक म्हणून बदली झाली आहे. मागील साडेचार वर्षाच्या काळात त्यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले . त्यानिमित्त आज धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मा. माधव यादव साहेबांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी व्हिजन इंग्लिश स्कुल चे संचालक संतोष कुलकर्णी , सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री प्रकाश मुळे, सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते अशोक उफाडे व सोसायटी सेक्रेटरी नरेंद्र धानोरकर यांची उपस्थिती होती .

error: Content is protected !!