जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा अनिवार्य-डॉ.पवन खेडकर

0 80

सेलू ( नारायण पाटील )
बदलत्या यांत्रीक यूगात जग स्पर्धात्मक होत आहे.प्रत्येक क्षणाला आपण स्पर्धेला सामोरे जातो.विद्यार्थ्यांना देखील वैद्यकिय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा परिक्षांना सामोरे जावे लागते. त्यामूळे यापूढे कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करावयाचे असेल तर, स्पर्धा अनिवार्य असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहायक संचालक तथा सेलूचे भूमिपूत्र डॉ.पवन खेडकर यांनी केले आहे .ते येथील व्हिजन इंग्लिश स्कूल येथे आयोजीत सत्काराला उत्तर देतांना शनिवार १६ मार्च रोजी बोलत होते .यावेळी व्हिजन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष संतोष कूलकर्णी ,रंगनाथ खेडकर,प्राचार्य हर्षद पांडव,श्रीपाद कूलकर्णी,मोहन बोराडे,आफ्रिन पठाण,अक्षय घूगे,गोपाळ उदावंत आदींची प्रमूख उपस्थिती होती.
केंद्रिय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होवून भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयात सहायक संचालक पदी निवड झाल्यानंतर ,माजी विद्यार्थी म्हणून गजानन कृपा शिक्षण संस्थेच्या वतिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सत्काराचे आयोजन केले होते.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना डॉ.पवन खेडकर यांनी,विद्यार्थ्यांनी शालेय जीवनपासूनच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे ,असे स्पष्ट केले .ते म्हणाले की,विद्यार्थ्यांनी,पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात त्याप्रमाणे कधीही इतरांशी स्पर्धा करू नये. त्या उलट विद्यार्थ्यांनी कायम स्वत:शी स्पर्धा केली पाहिजे.आज मिळवलेल्या यशा पेक्षा आपल्याला यापूढे अधिक यश कसे मिळवता येईल ,त्यासाठी जिद्द मनाशी बाळगूण चिकाटी जोपासली पाहिजे.यासाठी सतत व नियमित आभ्याससोबतच आपल्या सभोवताली तसेच देशात व जगात काय बदल होतात, यासाठी वर्तमानपत्र वाचण व दूरचित्रवाणीवरील विविध विषयावरील चर्चासत्र ऐकली पाहिजेत .आपल्या आवडीनूसार क्षेत्राची निवड करून त्याच क्षेत्रात आपल करिअर निश्चित केले पाहिजे. त्याच बरोबर आपले छंद देखील जोपासले पाहिजेत. असेही यावेळी बोलतांना त्यांनी स्पष्ट केले.गजानन कृपा शिक्षण संस्था व व्हिजन इंग्लिश स्कूल येथे आज माझा गौरव होत आहे, ही माझ्यासाठी सर्वात मोठी आनंददायी बाब आहे.मला जे आज यश मिळाले आहे, त्या पदाचा सन्मान करत, माझ्या पूढील आयूष्यात सरांनी दिलेले संस्कार व नितीमूल्ये मी कायम जोपासत राहिल .अशी ग्वाही डाँ.पवन खेडकर यांनी दिली आहे.
यावेळी पत्रकार मोहन बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले .अध्यक्षीय समारोप संतोष कूलकर्णी यांनी केला. तर सूत्रसंचलन सूचित्रा माने यांनी केले,तर प्राचार्य हर्षद पांडव यांनी आभार मानले.

error: Content is protected !!