परभणी जिल्हा सिडस्,पेस्टीसाईड, फर्टीलायझर एम्प्लॉइज असोसियशनची कार्यकारीणी जाहीर
परभणी,दि16 ःपरभणी जिल्हा सिडस्, पेस्टीसाईड & फर्टीलायझर एम्प्लॉइज असोसियशन संस्थापक अध्यक्ष व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत असोसियशनची नुतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
रोकड हनुमान मंदिर नवा मोंढा परभणी येथे शनिवार (दि.16 ) सकाळी 11 वाजता बैठक आयोजीत करण्यात आली होती.
शासनाच्या बदलत्या धोरणामुळे सर्वच क्षेत्रामध्ये अडचण निर्माण होत आहे.कंपनी प्रतिनिधींना विविध समस्याला तोंड द्यावे लागत आहे. यां समस्याच निराकरण करण्यासाठी संघटन गरजेचे आहे.
या करिता बैठकीला मध्ये सर्वानुमते परभणी जिल्हाध्यक्ष विठ्ल डुकरे तर सचिव राजेश सोळंके यांची निवड करून जिल्हा कार्यकारणी खालील प्रकारे उपाध्यक्ष प्रल्हाद मोहिते, अजय कुलकर्णी, दिलीप भारस्वावडकर सचिव राजेश सोळंके, सहसचिव विठ्ल बुलबुले,कार्याध्यक्ष बालाजी चौधरी, कोषाध्यक्ष हरिभाऊ झाडे, संपर्क प्रमुख उत्तम कुरे, संघटक विठ्ल परांडे, सल्लागार बाळासाहेब पवार, प्रमोद कुलकर्णी सदस्य प्रताप जाधव, संजय खिल्लारे, गजानन देशमुख, आशिष कदम, भिवराव देवकते, अमोल भिसाड,अशोक अहिरे व गजानन सातव आदींची निवड करण्यात आली.
जवळपास जिल्ह्यातील 150 ते 200 कंपनी प्रतिनिधीं उपस्थितीत होते.
यशस्वीतेसाठी दिनेश कुलकर्णी, संतोष दराडे, सुमित ढोले, मिलिंद पंडित, राजकुमार नीलेकर, संकेत शिंदे व सचिन घाटूळ आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय खवले तर सूत्रसंचालन गोविंद खटीग आणि आभाप्रदर्शन नरेंद्र पाटील यांनी मानले.