कॅमेरामन राहुल डंबाळे यांचे निधन
सेलू ( प्रतिनिधी)
रिपब्लिकन आवाज या न्यूज वेब पोर्टलचे कॅमेरामन राहुल लक्ष्मण डंबाळे ( वय 26) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी पहाटे तीन वाजता निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. रिपब्लिकन आवाज न्यूज पोर्टलचे संस्थापक संपादक पत्रकार अमोल डंबाळे यांचे ते छोटे बंधू होते.
राहुल हे गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर परभणी जिल्ह्यातील सेलु येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.