सेलूत मंगळवार पासून रामदासी कीर्तन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

0 62

सेलू / नारायण पाटील – येथील श्री.केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान व स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तनकुल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २१ ते २९ मे दरम्यान रामदासी कीर्तन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार
दिनांक २१ मे रोजी समर्थभक्त सुहासबुवा रामदासी ,बुधवार दि.२२ मे समर्थभक्त श्रीपादबुवा मुळे ,गुरुवार दि.२३ मे समर्थभक्त गणेशबुवा रामदासी ,शुक्रवार दि.२४ मे ते रविवार दि २६ मे समर्थभक्त निहाल खांबेटे ,सोमवार दि.२७ मे व मंगळवार दि २८ मे रोजी समर्थभक्त प्रकाशबुवा मुळे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनाची वेळ संध्याकाळी०८ ते १० असणार आहे.तर बुधवार दि.२९ मे रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.त्यामध्ये देवर्षी नारद कीर्तन पुरस्कार, समर्थभक्त प्रकाश महाराज गोंदीकर ,वेदव्यास कथा पुरस्कार ,समर्थभक्त पद्मनाभ महाराज व्यास ( तेर ) ,याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार, समर्थभक्त प्रशांत जोशी गुरुजी ( औंढा नागनाथ ) ,स्वामी विवेकानंद व्याख्याता पुरस्कार समर्थभक्त शंतनू रिठे ( पुणे ) यांना श्री.प.पु.कालिदास महाराज बोरीकर ( शिवाश्रम गुंज ) , प.पु.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज ( जोशीबाबा ,बीड) ,समर्थभक्त महंत योगेशबुवा रामदासी ( सज्जनगड ) या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

 

भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने दहा दिवस चालणाऱ्या आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान व स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तनकुल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!