पोखर्णी नृसिंह येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
परभणी,दि 08 –
पोखर्णी(नृसिंह) ता.परभणी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती शनिवार (ता.8) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गावातील खंडोबा मंदिर येथे माता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंचावर माजी आमदार मोहन फड,सुरेश भुमरे,विलास बाबर, आनंदराव बनसोडे,सरपंच डिगंबर एडके, उपसरपंच ज्ञानोबा वाघ,मा. सभापती तुकारामजी वाघ,मा. पंचायत समिती सदस्य गंगाधर भुमरे,मा. सरपंच इंद्रोबा मडके,पोलीस पाटील श्रीराम तावरे ,ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल वाघ,अशोक वाघ मा. सरपंच मदनराव वाघ,सीतारामजी वाघ,वचिष्ठ वाघ,विठ्ठल सुंदरराव वाघ यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानोबा निवृत्तीराव वाघ यांनी केले. या कार्यक्रमानन्तर गावातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे मिरवणूक रथामधून काढण्यात आली.मिरवणुकीत चिमुकल्यानी माता अहिल्याबाई यांची व्यक्तिरेखा साकारली होती.मिरवणूक गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यानंतर परभणी येथून आलेल्या चिमुकल्यांच्या पथकाने दांडपट्टा,तलवारबाजी,काठी फिरवणे आदि चित्तथरारक युद्धकला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी दैठणा पोलीस स्टेशन च्या पी एस आय बाळगावे मॅडम,कॉन्स्टेबल फड यांचे सहकार्य लाभले.