मानवत येथे महेश नवमी उत्साहात साजरी
मानवत – माहेश्वरी समाजाचे जन्मदाता भगवान महेश शिवशंकर यांनी शेकडो वर्षांपूर्वी राजस्थान मधील सिकर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावरील सिकर /दिल्ली या महामार्गावरील डोंगर रांगांच्या मध्यभागी असलेल्या लोहगल या ठिकाणी माहेश्वरी समाजाची उत्पत्ती माहेश्वरी समाजाची उभारणी केली.
भगवान महेश यांनी माहेश्वरी समाजाची उत्पत्ती जेष्ठ नवमी या दिनी केली असल्याने जे संपूर्ण देशातील सर्व माहेश्वरी बांधव या दिनी महेश नवमी म्हणून दिन हा सण उत्साह साजरा करतात.
मानवत येथील कटारे गल्ली परिसरातील हनुमान मंदिर च्या शेजारी असलेल्या महेश स्तंभ ची पूजा करून कटारी गल्ली.गोदु गल्ली. मुख्य मार्ग.मंत्री गल्ली. खंडेश्वर गल्ली.व मुख्य मार्ग अशा प्रकारे भगवान महेश यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा सकाळी आठ वाजता काढण्यात आली. या शोभा यात्रेमधील माहेश्वरी समाजाची युवक युवती बालगोपाळ महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रा काढत असताना शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिश बाजी करण्यात आली.