स्वदेशी ज्ञानाच्या आकलनाचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक-श्री अमृतराज कदम
श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न
पूर्णा / प्रतिनिधी – “स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदवी स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० लागू केले आहे. यामध्ये भारताच्या स्थानिक ज्ञान परंपरांच्या महत्त्वावर आणि लोकांमध्ये ‘भारतीयत्व’ ला प्रेरणा देण्यावर भर देण्यात आला आहे. या अनुषंगाने, विविध भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) चा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. याद्वारे स्वदेशी ज्ञानाच्या आकलनाचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे”, असे मत श्री गुरु बुद्धीस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव श्री अमृतराज कदम यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वनस्पतीशास्त्र बी. एस्सी (प्रथम वर्ष) व एम. एस्सी (द्वितीय वर्ष) आणि सूक्ष्मजीवशास्त्र बी. एस्सी (प्रथम वर्ष) व एम. एस्सी (द्वितीय वर्ष) अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार अध्यक्षस्थानी होते. विख्यात समाजसेवक डॉ. दत्तात्रेय वाघमारे, संस्थेचे सहसचिव तसेच माजी सीनेट सदस्य श्री गोविंद कदम, वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. साहेब शिंदे आणि सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष मोरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री अमृतराज कदम पुढे म्हणाले की, ‘कौशल्य शिक्षण’ ही पण सदरील शैक्षणिक धोरणाची अतिशय महत्वाची योजना असून सदरील योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्राध्यापकांनी थोडी अधिकची मेहनत घेण्याची तयारी दाखवावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
श्री गुरु बुद्धीस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री गुरु डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे, कोषाध्यक्ष श्री उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय दळवी, तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीमती दैवशाला कामठाणे यांनी सदरील कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला संयोजन सचिव डॉ. संजय दळवी यांनी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यशाळा घेण्यामागील उद्देश याबद्दल माहिती दिली. प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यातिल संभाव्य अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याची माहिती दिली. डॉ. पल्लवी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. श्रीमती दैवशाला कामठाणे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. उद्घाटन समारंभनंतर प्रा.बी.एस. सुरवसे, डॉ. अंबादस कदम, डॉ. प्रशांत वक्ते, डॉ. आर. एस. अवस्थि तसेच दोन्ही विषयाचे अभ्यास मंडळ सदस्य यांच्या उपस्थितीत पुढील दोन तांत्रिक सत्रात अभ्यासक्रमाविषयी सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सहाय्यक संयोजन सचिव डॉ.रवींद्र राख, डॉ. पुष्पा गँगासागर, उपप्राचार्य डॉ. गजानन कुरुंदकर, उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे, उपप्राचार्य श्री आबाजी खराटे, पर्यवेक्षक श्री उमाकांत मिटकरी, डॉ. रवी बर्डे, डॉ. संतोष चांडोळे, डॉ. जितेंद्र पुल्ले, डॉ. प्रकाश भांगे, डॉ. राजू शेख, डॉ. विजय पवार, डॉ. दिशा मोरे, डॉ. वृषाली अंबटकर, डॉ. वेंकट कदम, श्री बाळासाहेब कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.