संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण
परभणी – दिनांक 29 जुलै
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सन 2022 – 23 या वर्षातील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील जिल्हास्तरीय पुरस्कार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते सदर पुरस्कारांचे वितरण जिल्हा परिषदेत करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोंशिकर, स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजेंद्र मुंढे, प्राथमिक शिक्षण अधिकारी सुनील पोलास, जिंतूरचे गट शिक्षण अधिकारी त्रिंबक पोले, समाजशास्त्रज्ञ परमेश्वर हलगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान वर्ष सन 2022 – 23 जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती
प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत रामपुरी बु. ता.मानवत, द्वितीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत तेलजापुर ता.पालम, तृतीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत कुंभारी ता.जिंतूर या ग्रामपंचायतींना सदरचे पुरस्कार, सन्मानपत्र वितरित करण्यात आले.
विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती
स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार (घनकचरा सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन) ग्रामपंचायत ममदापूर ता. पूर्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन पुरस्कार ग्रामपंचायत सायखेडा बामणी ता. जिंतूर, स्वर्गीय आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) ग्रामपंचायत खरब धानोरा ता. पालम
पुरस्कार वितरण प्रसंगी रामपुरी ता. मानवतच्या सरपंच जयश्री दुर्गादास साठे, ग्रा. पं.सदस्य सुरेश यादव, ग्राम विकास अधिकारी कृष्णा कानडे, कुंभारी ता. जिंतूरच्या सरपंच पार्वती शेषराव हरकळ, उपसरपंच रामदास आवरगंड, ग्रामसेवक अशोक रेंगे, तेलजापूर ता. पालमचे सरपंच हनुमंत मोगरे, ग्रामसेवक बालासाहेब घनवटे, खरब धानोरा तालुका पालमच्या सरपंच निलावंती कुंटे, ग्रामसेवक अच्युत भालेराव यांची उपस्थिती होती.
ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने हार्दिक अभिनंदन तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विकासात्मक दृष्टिकोन ठेऊन गाव विकासासाठी पुढाकार घ्यावा.
रश्मी खांडेकर
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, परभणी
लोकसहभाग आणि ग्रामपंचायतीच्या विशेष प्रयत्नातून गावोगावी स्वच्छतेची लोकचळवळ उभी रहावी. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने अभिनंदन
विजेंद्र मुंढे
प्रकल्प संचालक
जल जीवन मिशन,
जिल्हा परिषद, परभणी