मी कधीही गट-तट, पक्ष न पाहाता लोकांची कामे करतो – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे

कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप : तब्बल १ हजार लाभार्थी

0 9

 

गंगाखेड (प्रतिनिधी):-
कोणत्याही भागाचा विकास करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून कामे केली पाहिजेत. ग्रामीण व शहरी भागाचा कायापालट करण्यासाठी पायाभूत सुविधा व नागरी प्रश्न सोडविणे आवश्यक असते. माय-बाप जनतेने त्यांच्या कामांसाठीच लोकप्रतिनिधीला निवडून दिलेले असते. विकास कामात राजकारण आणले तर, कोणतेच काम पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे मी कधीही गट-तट, पक्ष न पाहाता लोकांची कामे करतो. म्हणून सामान्य लोकांशी माझी नाळ जोडली गेली आहे, असे प्रतिपादन गंगाखेडचे रासप आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

शहरातील स्व.गोपीनाथ मुंडे सभागृह येथे आयोजित कामगार गृहोपयोगी वस्तू संच वाटप आ.गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या शासकीय योजना मदत केंद्राने हे आयोजन केले होते.

पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले की,अंग मेहनत करून काबाडकष्ट करणाऱ्या कामगार बांधवांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येतील अशा वस्तू देऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा सन्मान केला आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टाला मुद्देचा हात देताना मला विशेष समाधान वाटत आहे. आपल्या गंगाखेड विधानसभा कार्यक्षेत्रात कोणताही कामगार बांधव या लाभापासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता शासकीय योजना मदत केंद्राने घ्यायला हवी.

याप्रसंगी बोलताना मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे म्हणाले की, या वस्तू वाटप संचामध्ये विविध प्रकारचे गृहपयोगी साहित्य आहे. त्याची कामगारांना मदत होईल. तसेच त्यांना प्रोत्साहन सुद्धा मिळेल. त्यामुळे आपल्या भागातील जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

दरम्यान, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या या गृहोपयोगी वस्तू संचाचे तब्बल १ हजार कामगार लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत चक्के आणि सूत्रसंचालन पदुदेव जोशी यांनी केले. तर आभार सचिन राठोड यांनी व्यक्त केले.

यावेळी मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासप जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, प्रभारी हनुमंत मुंडे, पालम तालुका प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, राधाकृष्ण शिंदे, शहराध्यक्ष ॲड.अकबर सय्यद, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, राजू खान, उद्धव शिंदे, माणिकराव आळसे, नागनाथ कासले, वैजनाथ टोले, पिराजी कांबळे, उद्धव शिंदे, चांद भाई, सतिश घोबाळे, संजय पारवे, इंतेसार सिद्दिकी राजेभाऊ (बापू) सातपुते, खालेद शेख लाभार्थी कामगार बंधू आणि भगिनी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

…तर खोटे आरोप परतवून लावा : आ.डॉ.गुट्टे

राज्यात कुठेही महायुतीला चांगले पाठबळ मिळत आहे. विविध महत्वकांशी योजनेच्या माध्यमातून महायुतीने जनाधार निर्माण केला आहे, हि खूप सकारात्मक बाब आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून फेक नरेटीव्ह पसरवला जात आहे. त्यामुळे घराघरात जाऊन महायुतीची कामे निर्णय आणि तरतुदी व धोरण लोकांना समजावून सांगा आणि विरोधकांचा खोटा नरेटीव्ह व आरोप परतावून लावा, असेही आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

error: Content is protected !!