रवळगाव येथील तरुणाचा लोणार येथे आढळला मृतदेह
सेलू( प्रतिनिधी )
: तालुक्यातील रवळगाव येथील अर्जुन दिलीप रोडगे या तरुणाचे प्रेत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील निर्जनस्थळी आढळून आले आहे. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात तिघा जणाविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सेलू तालुक्यातील रवळगाव येथील दिलीप रोडगे यांचा मुलगा अर्जुन रोडगे यास अर्चना विठ्ठल सरोदे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली डूकरे, किशोर अर्जुन डूकरे या तिघांनी कुठे तरी डांबून डांबूून ठेवले असल्याची तक्रार दिलीप रोडगे यांनी दिली होती.
याबाबत सेलू पोलिस त्याचा शोध घेत असताना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील एका निर्जनस्थळी अर्जुन रोडगे याचे प्रेत आढळून आले. घटनास्थळी सेलू पोलिस दाखल झाले असून सायंकाळी उशीरापर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरु होती. सदर तरुणाच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच पोलिस तपासात मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.