सेलूत तीन गावठी दारूचे अड्डे उध्वस्त तर ३० वाहन चालका कडून २७,५००/- दंड वसूल

सेलू पोलिसांची धडक कार्यवाही

0 35

सेलू / प्रतिनिधी – सेलू पोलिसांनी शहरातील तीन गावठी हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त करून वाहतुकीच्या नियमानुसार वाहन न चालवणाऱ्याकडून एकूण २७५००/- रुपयांचा दंड वसूल केला आहे .

पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने अचानक धाड टाकून वालुर नाका परिसरातील तीन हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त करून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन व साहित्य मिळून एकूण १६,४००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाआहे .व लताबाई काळे ,यमुनाबाई काळे व राधाबाई काळे या तीन आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ F नुसार गुन्हे नोंद केले आहेत . याकामी पोलीस उप निरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख ,सपोनि प्रभाकर श्रीराम कवाळे ,काशिनाथ रोहिदास मूलगिर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन कामगिरी बजावली.या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार शेख उस्मान व तेलंगे करीत आहेत .

 

तसेच वाहतूक नियमाचे पालन नकरता वाहन चालवणाऱ्या ३० वाहन चालकाकडून एकूण २७५००/- चा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.यामध्ये १५ जणांकडून विना हेल्मेट बाबत प्रत्येकी १०००/- प्रमाणे १५०००/-
विदाऊट सीट बेल्ट वाहन चालवल्या प्रकरणी ७-जणांकडून प्रत्येकी १०००/- प्रमाणे ७०००/-
तिबल सीट वाहन चालवणाऱ्या तीन चालकाकडून प्रत्येकी १०००/- प्रमाणे ३०००/- तर इतर ५ केस मध्ये २५००/- रुपयांचा असा एकूण २७५००/- रुपयांचा दंड वसूल केला आहे .तसेच दारू पिऊन वाहन चालवल्या प्रकरणी ड्रिंक अँड ड्राइव्ह ची एक केस करण्यात आली आहे .

 

पोलिसांच्या या धडकेबाज कार्यवाही मुळे मात्र हातभट्टी चालक व नियमानुसार वाहन न चालवणाऱ्या वाहन चालकामध्ये दहशत निर्माण झाली आहे .
पोलिसांच्या या कामगिरी बाबत समाधान व्यक्त केले जात आहे .परंतु गेल्या कांही दिवसापासून शहरात मोटार सायकल चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे .व इतर अवैध्य धंदे देखील डोके वर काढीत आहेत .या कडे देखील पोलीस प्रशासनाने आपल्या कार्यवाहीचा मोर्चा वळवावा .अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत आहे .

error: Content is protected !!