भयंकर..कार्यालयातच तलाठ्याची चाकुने भोसकुन हत्या
परभणी,दि 28 ःप्रलंबीत फेरफारवरुन तलाठ्याचा कार्यालयात चाकुने वारर करत खुन केल्याची घटना वसमत ताललुक्यातील आडगाल रंजेबुवा येथे बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडलली.संतोष पवार (वय 36) असे मयत तलाठ्याचे नाव आहे.
अधिकची माहिती अशी की, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार यांच्या कार्यक्षेत्रात बोरी सावंत येथील शिवार आहे.पवार हे बुधवारी आडगाव येथील त्यांच्या तलाठी कार्यालयात काम करत असताना बोरीसावंत येथील प्रताप कराळे नामक तरुणाने कार्यालयात जात व्हाट्सअप्प ग्रुपवरील मेसेजवरुन वाद सुरु केला. त्यावर तलाठी पवार यांनी मी योग्यच टाकले जे टाकले असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर प्रताप कराळे नावाच्या युवकाने तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिर्चीची पूड टाकत चाकूने अनेक वार केले.
यावेळी तिथे असलेले शिकाऊ तलाठी बालाजी डवरे यांनी कराळे यांना धरून चाकू हिसकावून घेत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कराळे याने पोबारा केला. यानंतर तलाठी संतोष पवार यांना जखमी अवस्थेत परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ही बाब कळताच परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह सर्वच महसूल अधिकारी कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकत्र आले होते.
सर्व अधिकाऱ्यांसमोर पवार यांच्या कुटुंबाने टाहो फोडत आरोपीला फाशी देण्याची मागणी केलीय. संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे संभाजीनगर इथून निघाले असून संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना ते भेट देणार आहेत. पोलिसांनी यातील आरोपी प्रताप कराळे याला अटक केलीय.