पंचनामे करून आर्थिक मदत करा-आ.राजेश विटेकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0 9

परभणी,दि 02 (प्रतिनिधी)
गेल्या 48 तासातील अतिवृष्टीने खरीप पिकांचे सर्वदूर अतोनात असे नुकसान झाले असून त्यामुळे महसूल प्रशासनाने खरीप पिकांच्या या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

जिल्ह्यात काल पासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून, काल झालेल्या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील 52 पैकी पूर्णा व पिंगळी हे महसूल मंडळ वगळता बाकीच्या 50 महसूल मंडळ मध्ये अतिवृष्टी झाली आहे,त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आलेली आहेत.
जिल्ह्यात काल पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे करण्याची गरज आहे, व शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे आर्थिक मदत मिळण्याची गरज आहे, पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पिकांचा विमा भरलेल्या शेतकरी बांधवांनी आपल्या खरीप पिकांचे झालेले नुकसान विमा कंपनीस 72 तासाचे आत तात्काळ कळवणे आवश्यक आहे ; तसा नियम विमा कंपन्यांचा आहे, पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील पिकांचे, व नुकसानीचे फोटो स्वतः कडे काढून ठेवावेत , व तात्काळ नुकसान भरपाई बाबत विमा कंपन्यां कडे ऑनलाईन तक्रार दाखल कराव्यात, तसेच ऑफलाईन तक्रारी नोंदविण्यासाठी कृषी अधिकारी व कर्मचारी यांना महसूल मंडळ स्तरावर शेतकऱ्याचे अर्ज घेण्याबाबत च्या सूचना जिल्ह्यातील कृषी विभाग यांना करण्यात याव्यात, जेणेकरून पीकविमा कंपन्या कडे मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई बाबत च्या तक्रारी नोंद होवून शेतकऱ्यांना भविष्यात पिकविम्याची आर्थिक मदत मिळण्यास अडचणी निर्माण होणार नाही. यासाठी महसूल, कृषी विभाग यांना त्याबाबत निर्देश द्यावेत अशी मागणी ही आ विटेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे दिलेल्या निवेदनात केली आहे , जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याने नद्या , नाले, बंधारे व पाणी साठे हे धोक्याची पातळी ओलांडू शकतात, अश्या परिस्थितीत जलाशय व नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, व पुराचा धोका उद्भवू शकणाऱ्या नद्यांच्या नियंत्रण रेषेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत महसूल, पोलीस, ग्रामविकास विभागाच्या स्थानिक अधिकारी , कर्मचारी यांना जिल्हा प्रशासनाने तात्काळ गावागावात दवंडी द्वारे सुरक्षितते साठी पावूले उचलण्याबाबत यंत्रणांना जिल्हा प्रशासन कडून तात्काळ सूचना देण्यात याव्यात व संबधित विभागाच्या अधिकारी , कर्मचारी यांना गावात राहण्याच्या सूचना करण्यात याव्यात असेही निवेदनात म्हंटले आहे .

मुख्यमंत्राना भेटुन परिस्थितीची माहिती देणार-आ.विटेकर
जिल्ह्यातील पावसाची व अतिवृष्टीची गंभीरता लक्षात आणून देण्यासाठी मी  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांची भेट घेऊन सर्व गंभीर परिस्थितीची माहिती देणार आहे, नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे तसेच घरे, जनावरे, यांचेही पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे व आर्थिक मदत देण्याबाबतचे निर्देश महसूल, कृषी प्रशासनाला देण्यात यावेत अशी विनंती मी मंत्री महोदय यांच्या कडे करणार आहे अशी माहिती आ राजेश विटेकर यांनी दैनिक शब्दराजशी बोलताना दिली आहे.

error: Content is protected !!