सेलूत संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यावर सुंदर देखाव्याचे सादरीकरण
सेलू / प्रतिनिधी – सेलू येथील श्री अरुण रामपूरकर हे दरवर्षी गौराई समोर समाज प्रबोधनपर देखावा सादर करत असतात .यावर्षी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित सुंदर देखाव्याचे सादरीकरण केले आहे. पर्यावरण रक्षण, भूतदया, समाजातील अनिष्ट रूढींवर संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगाद्वारे केलेले समाज प्रबोधन, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट,संत तुकाराम महाराज यांचे शिष्य संताजी जगनाडे महाराज,पालखी सोहळ्यातील रिंगण, संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन या सर्व बाबींचा अंतर्भाव करत सुंदर सजीव देखावा श्री अरुण रामपूरकर यांनी साकारला आहे. देखावा बघण्यासाठी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत .