मोफत भव्य रक्त तपासणी शिबीर संपन्न
समता गणेश मंडळ व महा लॅब उपजिल्हा रूग्णालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन, १०७ नागरिकांची रक्त तपासणी
सेलू / नारायण पाटील – येथील समता गणेश मंडळ व महा लॅब उपजिल्हारुग्णालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने दि 13 सप्टेंबर शुक्रवार रोजी आयोजित मोफत रक्त तपासणी शिबीरात १०७ जणांची रक्त तपासणी करण्यात आली. या मध्ये सी,बी,सी, के,एफ टी,एल,एफ टी,टी एफ ,टी,एच ,बी एच,1 सी,लिपीड प्रोफाईल, सि,ए 125 , युवरीक अॅसीड, सीरम कॅल्शियम, सी,आर पी, एकुण 13 रक्त तपासण्या करण्यात आल्या,
महा लॅब चे चैतन्य निकम,रंजना शेळके, अनूज डख,ओम भाबट यांनी रक्त तपासणी केली असून या शिबीरात मा.बांधकाम सभापती आशोक काकडे, पांडूरंग कदम, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, सचिन धापसे,अनिकेत शिंदे,सचिन चव्हाण, राहुल कदम,राजकुमार वखरे,गोविंद आबुज, वैभव वरकड,किरण ठाकरे,बालाजी आबुज,स्वप्नील शहाणे,प्रकाश मुसळे, आदि उपस्थित होते.