मोफत रोग निदान व मोतीबिंदू तपासणी शिबीर
परभणी – शहरातील प्रभाग क्र. 5 मधील भारतीय बाल विद्या मंदिर शाळेत मोफत रोग निदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीरात जवळपास 1000 रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच नेत्र तपासणी केलेल्या रूग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. यामध्ये 60 रूग्णांवर लवकरच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन गंगा ठाकूर यांनी केले होते तर आर पी हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टीट्यूटच्या सौजन्याने हे शिबीर पार पडले. यावेळी मा.जि.प. सदस्य रवि भाऊ पतंगे, मा. नगरसेवक प्रशास ठाकूर, गजानन काकडे, शेखर अण्णा सवंडकर, पिंटू कदम, सोनू पवार, अशोक सालगोडे, लालू अग्रवाल आदींची विशेष उपस्थिती होती.