सेलूची डॉ.दिपाली कुलकर्णी उच्च शिक्षणासाठी जर्मनीला रवाना
सेलू (प्रतिनिधी)
येथील शिक्षक कॉलनी मधील निवृत्त शिक्षक वसंतराव कुलकर्णी ( वाकडीकर ) यांची नात डॉक्टर दिपाली संतोष कुलकर्णी हिची नुकतीच हेडेलबर्ग युनिव्हर्सिटी जर्मनी येथे इंटरनॅशनल पब्लिक हेल्थ या विषयावर स्नातकोत्तर शिक्षणासाठी निवड झाली असून ती रवाना झाली आहे.
या विषयासाठी संपूर्ण जगातून फक्त वीस जागा असून भारतामधून डॉ कल्पना कुलकर्णी हिची निवड झाली आहे या तिने सेलू शहराचे नावं अटकेपार माध्यमातून नेल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन होत आहे. भविष्यात WHO मध्ये सेवा व संशोधन करण्याचा तिचा उद्देश आहे.
तिने मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी सुद्धा प्राप्त केली आहे. तिचे शिक्षण संभाजीनगर येथून पूर्ण केलेले आहे