आमदार राजेश विटेकर यांना मंत्रिमंडळात घ्या,रोहन सामाले यांचे अजितदादांना साकडे

2 20

परभणी, दिनांक १३
परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत यश मिळवण्यासाठी आमदार राजेश विटेकर यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन सामाले यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे.

पाथरी विधानसभा मतदार संघात आमदार राजेश विटेकर यांनी विजय मिळवला, परभणी जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट करण्यात आमदार राजेश विटेकर यांचा मोठा हातभार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेवर त्यांची मजबूत पकड आहे. राजेश विटेकर यांना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तत्कालीन नेते मंडळींनी सातत्याने डावलले होते, परंतु आपण त्यांना विधान परिषदेवर घेऊन अन्याय दूर केला, विधानसभेवर देखील त्यांचा विजय झाला. त्यामुळे हा विजय कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे, आता भविष्यात परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व राजेश विटेकर यांच्याकडेच राहणार आहे, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून राजेश विटेकर यांना ओळखले जाते,त्यामुळे त्यांना मंत्री केले तर परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी बळकट होईल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यादेखील राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. परभणी महानगरपालिकेची निवडणूक देखील महत्त्वाची आहे, त्यामुळे पक्षाला सद्यस्थितीत असलेली मरगळ दूर करण्यासाठी विटेकर यांना मंत्री केले तर कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारेल आणि त्याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसून येतील, परभणी सह हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यात देखील विटेकर यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळे विटेकर यांना मंत्रिमंडळात संधी देऊन द्यावे अशी मागणी रोहन सामाले यांनी केली आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची त्यांनी भेट घेऊन पत्र दिले आहे.

error: Content is protected !!