बीड प्रकरण संसदेत..खासदारांनी उठवला आवाज
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने महाराष्ट्र नाही तर देश हादरुन गेला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप अटकेत नसल्याने घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येचे पडसाद थेट लोकसभेत उमटले असून या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे आक्रमक झाले आहेत.
जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाच्या युवक सरपंचांचा निर्घुनपणे खून करण्यात आल्यानंतर बीड (Beed) जिल्ह्यात खळबळ उडाली असून बीडनंतर राज्यातील काही जिल्ह्यातही या घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती. त्यानंतर, बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलन देखील करण्यात आले. दुसरीकडे, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन घटनेच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर, आज संसंदेच्या हिवाळी अधिवेशनात बजरंग सोनवणे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे, हे प्रकरण आणखी गंभीर होत चाललं आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये एसआयटी नेमण्यात आली असून सीआयडीची टीम देखील मस्साजोग गावात पोहोचली आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संसद सभागृहात बजरंग सोनवणे यांनी चर्चा केली, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही, असे म्हणत या प्रकरणातील जे मारेकरी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी थेट देशाच्या सर्वोच्च सभागृहात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आजच राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळ सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, सकाळी दानवे यांनी राज्याच्या सभागृहात तर खासदार बजरंग सोनवणे यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात हा प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. संसंदेच्या हिवाळी अधिवेशनात आज बजरंग सोनवणे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे, हे प्रकरण आणखी गंभीर होत चाललं आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये एसआयटी नेमण्यात आली असून सीआयडीची टीम देखील मस्साजोग गावात पोहोचली आहे.