नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट ढकलणे बंद

0 125

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता नो डिटेंशन पॉलिसीला समाप्त करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट ढकलणे बंद केले जाणार आहे. या नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र ते जर दुसऱ्यांदाही नापास झाले तर त्यांना वरच्या वर्गात जाण्याची द्वार बंद केले जाणार आहे. आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढणार नाही असेही सरकारने म्हटले आहे.

 

सोमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘नो डिटेंशन पॉलिसी’ संपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक काळापासून सुरु असलेल्या व्यवस्थेत बदल केला आहे. या निर्णयनंतर इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या वार्षिक परिक्षेत उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे बंद केले जाणार आहे. या निर्णयामुळे शाळांमध्ये आता गुणवत्ता वाढले असे म्हटले जात आहे.

 

इयत्ता ५ आणि ८ च्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम

नवीन शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता वाढविणे आणि त्यांचा अकॅडमिक परफॉर्मेस सुधारण्याचा उद्देश्य आहे. शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही ‘नो डिटेंशन पॉलिसी’ समाप्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या पॉलीसीवर खूप काळापासून चर्चा सुरु होती. परंतू आता नव्या व्यवस्थेनुसार पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परिक्षेत अयशस्वी विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट ढकलणे बंद होणार आहे.

error: Content is protected !!