आकाशाला गवसणी घालायची असेल तर शालेय जीवनापासूनच तयारीला लागा- समुपदेशक प्रविण सोनोने

0 22

परभणी,दि30 ः
विद्यार्थ्यांनी आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित सकस आहार , व्यायाम व खेळ याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनाचा व बुद्धीचा सर्वांगीण विकास होतो. शारीरिक , मानसिक व बौद्धिक विकासाच्या बळावर विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करू शकतात. यासाठी पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घ्यावा. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयरुपी आकाशाला गवसणी घालायची असेल तर शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी सज्ज राहिले पाहिजे. असे प्रतिपादन समुपदेशक प्रविण सोनोने यांनी केले.
शहरातील बाल विद्यामंदिर प्राथमिक शाळेत सखी सावित्री समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रशालेतील ज्येष्ठशिक्षक तथा समुपदेशक प्रविण सोनोने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सिंधू शर्मा या होत्या. यावेळी नानलपेठ विभाग प्रमुख सौ. सुनीता जाधव , सकाळ सत्र पर्यवेक्षिका सौ. रोहिणी जोशी आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा निकम यांनी केले.तर आभार रोहिणी जोशी यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!